The Surprising Intelligence of a 10 Year Old Child

10 वर्षाच्या मुलाची आश्चर्य चकित करणारी बुद्धिमत्ता

मी माझं काम संपवून दिल्ली एअरपोर्टच्या वेटिंग लॉबीमध्ये शांतपणे पुस्तक वाचत बसलो होतो. तेवढ्यात लॅपटॉपवर एक महत्त्वाची फाईल आली. ती वाचण्यात आणि डिजिटल सिग्नेचर करून पाठवण्यात मी मग्न झालो.
     तेवढ्यात एक लहानसा मुलगा माझ्या जवळ आला. माझ्या शेजारच्या खुर्चीवर ठेवलेल्या पुस्तकाकडे पाहत तो म्हणाला—
“Excuse me sir, मी तुमचं पुस्तक पाहू शकतो का?”
मी त्याच्याकडे पाहून हसत म्हणालो—
“Yes, why not!”
त्याने पुस्तकाची अनुक्रमणिका (Index) वाचायला सुरुवात केली. तोपर्यंत मी माझं काम पूर्ण करून लॅपटॉप बंद केला. तेवढ्यात तो मुलगा म्हणाला—
“छान आहे सर पुस्तक. तुमचं वाचन झालंय का अजून बाकी आहे?”
मी त्याचा चेहरा वाचत म्हणालो—
“एकदा वाचलं आहे. का, तुला वाचायचं आहे?”
तो थोड्या वेगळ्या, उत्सुक हसण्याने म्हणाला—
“इच्छा खूप आहे, पण इथे एवढा वेळ नाही.”
मी सहज म्हणालो—
“घरी घेऊन जा आणि निवांत वाच.”
आणि तिथून आमचं संभाषण सुरू झालं.
५–६ मिनिटांनंतर त्याचे वडील म्हणाले—
“बेटा, अंकल ला त्रास देऊ नकोस.”
तो काही बोलायच्या आधीच मी म्हणालो—
“काही हरकत नाही सर, बोलू द्या.”
हे ऐकून त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता.
मी त्याला विचारलं—
“बोल बाळा, काय म्हणत होतास?”
तो म्हणाला—
“सर, तुम्ही लॅपटॉप वर लिहिलेलं आहे ना… ते खूप छान आहे.”
मी विचारलं—
“तुला माहिती आहे ते काय आहे?”
आणि आश्चर्य म्हणजे, त्या मुलाने ते पूर्णपणे उदाहरणांसह समजावून सांगितलं.
मी फक्त त्याच्याकडे पाहतच राहिलो.
त्याने विचारलं—
“सर, तुम्ही काय करता? जॉब, बिझनेस की अजून काही?”
मी उत्तर दिलं—
“मी मुलांना फिजिक्स शिकवतो.”
तो हसत म्हणाला—
“Hiding identity!”
मी म्हणालो—
“नाही रे! तू कोणत्या क्लासमध्ये आहेस?”
“चौथीत. पण शाळेत जे शिकवतात ते अपूर्ण वाटतं. सिलेबस खूप बोरिंग आहे.”
“अभ्यासाच्या व्यतिरिक्त काही करतोस?”
“हो, डान्स क्लास, स्पॅनिश आणि चायनीज लँग्वेज चे ऑनलाईन क्लास, बॅडमिंटन, क्रिकेट खेळतो.”
मी विचारलं—
“मग तुला काय काय शिकायला आवडतं?”
त्याचा चेहरा उजळला…
“टेक्नॉलॉजी, लोकांची मानसिक अवस्था, ब्रह्मांड, जागतिक परिस्थिती, परदेशी लोकांचं वर्तन, बायोलॉजी, इकॉनॉमिक्स, मॅथ… ज्या गोष्टी समजून घेता येतात त्या सगळ्या मला आवडतात.”
सहज बोलताना आमच्या पुढील विषयांवर चर्चा झाली—
प्रगत आणि मागास देशांची आर्थिक, मानसिक व शैक्षणिक स्थिती
जोनाथन जोसेफ जेम्स
भविष्यातील सायबर धोके
आंतरराष्ट्रीय राजकारण
डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन
उपयोगिता व घटती सीमांत उपयोगिता सिद्धांत
भारतीय शिक्षण प्रणाली
फक्त १० वर्षांचा मुलगा… आणि एवढं सखोल ज्ञान!
मी त्याला विचारलं—
“तुला एवढं नॉलेज कुठून मिळालं?”
तो सहज म्हणाला—
“माझ्या बेस्ट फ्रेंड्सकडून.”
“कोण?”
“Google, Gemini, ChatGPT, Books, आणि Hello Pal.”
(टीप: Hello Pal अ‍ॅपमध्ये सायबर फ्रॉडचे प्रमाण जास्त आहे. वापर करताना स्वतःच्या जबाबदारीने वापर करावा.)
    तेवढ्यात माझ्या फ्लाईटची वेळ झाली. इच्छा नसतानाही त्या मुलाला ‘Bye’ म्हणावं लागलं.
आज दोन दिवस झाले…
पण तो मुलगा सतत आठवत आहे.
फक्त १० वर्षांचा मुलगा आणि एवढी जिज्ञासा, विचारांची खोली, बोलण्याची शैली…
हे सगळं पाहून मी आजही आश्चर्यचकित आहे.
आजची पिढी केवळ ‘स्क्रीन’ कडे बघून वेळ घालवणारी नाही, तर योग्य साधने मिळाली तर ती काय चमत्कार घडवू शकते, याचे तो मुलगा एक जिवंत उदाहरण आहे. १० वर्षांच्या मुलाची जिज्ञासा आणि विश्लेषणात्मक विचार करण्याची पद्धत पाहून भविष्यातील ‘स्मार्ट इंडिया’ची स्वप्ने नक्कीच सत्यात उतरतील.

SHARE POST

Leave a Reply