Brain Structure and Functions

मेंदूची रचना आणि कार्य

     सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याच काम मेंदू करत असतो, आपले पंचद्रिये म्हणजे कान, नाक, डोळे, त्वचा, आणि जीभ हे सर्व आपल्या शरीराच्या आत तसेच बाहेर होणाऱ्या घडामोडीची माहिती देणारे संदेश सतत मेंदूकडे पाठवत असतात, त्याचा अर्थ समजऊन घेऊन मेंदुच शरीराच्या निरनिराळ्या अवयवांना त्या संदेशांना कोणता प्रतिसाद द्यायचा तो देत असतो. मेंदूच्या वेगवेगळ्या अवयवाकडून वेगवेगळ्या क्रियांचं नियंत्रण होत असतं.
  1. झोप आणि मेंदू
  2. मेंदुच वजन
  3. मेंदूचा रंग
  4. मेंदूचे सुरक्षा कवच
  5. मेंदूचे मुख्य भाग
  6. सेरेब्रम
    • फ्रन्टल लोब
    • पॅरिटल लोब
    • ऑक्सिपिटल लोब
    • टेम्पोरल लोब
  7. सेरेबेलम
  8. ब्रेन स्टेम
  9. स्पायनल कॉर्ड
  10. न्यूरॉन्स


झोप आणि मेंदू :–

दिवसापेक्षा आपला मेंदू रात्रीला जास्त मग्न असतो, झोपेमध्ये स्मृतीची उजळणी होत असते, म्हणजे दिवस भर जेवढ आपण अनुभवतो किंवा शिकतो तेवढ आपला मेंदू त्याची व्यवस्थित मांडणी करत असतो, जेव्हा मेंदूला एखाद्या किंवा त्या पेक्षा जास्त विचाराची मांडणी करत असतांना अडथळा तयार होतो तेव्हा आपल्याला मेंदू ति गोष्ट स्वप्नाच्या स्वरूपात दाखवतो, त्यामुळे आपल्याला कधी कधी विचित्र स्वप्न येत असतात. झोपेच्या कमतरतेने विस्मरणाचा धोका तयार होतो, अन्नाच्या अभावा पेक्षा झोपेच्या अभावी मनुष्य लवकर मरू शकतो, साधारण सात आठ तास झोपेची आपल्याला नितांत गरज असते, आणि नवजात शिशूला 14 ते 16 तासाची सक्त गरज असते. आपल्या मेंदूकडे कल्पना करण्याचा भाग असल्याने मनुष्य बाकीच्या प्राण्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे.

मेंदुच वजन :–

वीस ते चाळीस लाख वर्षापूर्वीच्या मानवसदृश प्राण्याच्या मेंदुच वजन 400 ग्राम होत. समोर विकास होऊन दोन लाख वर्षा पूर्वीचा माणसाचा पूर्वज ‘होमो इरेक्टस’ त्याच्या शरीराच वजन आजच्या एवढंच होत पण मेंदुच वजन 700 ते 750 ग्रामच होत. पुन्हा विकास होऊन मानवी मेंदुच वजन आता 1400 ते 1500 ग्राम झाल आहे. मनुष्याच्या गर्भवस्थेत वाढलेला मेंदू गुळगुळीत असतो, जन्मल्या नंतर ही तो जवळ पास सहा महीने त्यात फारसा फरक पडत नाही, सहा महिन्या नंतर त्याला वळकट्या पडायला सुरुवात होते, त्यानंतरच्या वाढीत मेंदुमध्ये ग्लायल पेशीची भर पडत जाते तसेच वेळोवेळी मिळालेल्या माहिती, अनुभवा नुसार शिकवणी नुसार चेतापेशीची जोडणी होत त्याची जाळी तयार होतात आणि मग हीच क्रिया आयुष्य भर चालूच राहते. नवजात अर्भका पासून ते 12 वर्षा पर्यंत मानुष्याचा मेंदू वाढत 1440 ग्राम पर्यंत पोहचतो. 56 वर्षा पर्यंत हे वजन स्थिर राहून 56 वर्षा नंतर ते थोड कमी होयाला लागत म्हणजे 80 वर्षा नंतर हेच वजन 1440 वरुण 1310 पर्यंत होत. पुरुषाच्या मेंदूच्या तुलनेत स्त्रियांच्या मेंदुच वजन थोड कमी असत. जगाच्या पाठीवरचा सर्वात बुद्धिवान भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन च्या मेंदुच वजन 1230 ग्रामच होत, त्यांच्या मेंदूचा अभ्यास केल्यावर कळाल की गणित आणि अवकाशाच भान या गोष्टीवर नियंत्रण असणारा मेंदूचा जो भाग होता तो भाग इतर माणसाच्या तुलनेत 35 % रुंद होता.

मेंदूचा रंग :-

मेंदूमधले रक्तवाहिन्याच जाळ आणि वेगवेगळे भाग हे एकमेकांत गुंतलेले असतात मेंदूचा पृष्टभाग हा हलकासा चमकणारा असतो, मेंदू वरतून गुलाबी रंगाचा दिसतो तरी तो पांढऱ्या आणि करड्या वस्तुनं (मॅटरनं) ने बनलेला असतो, मज्जातंतुंना ( नर्वज फायबरला ) वेढणाऱ्या मायलिन या भागांचा रंग पांढरा असतो तर बाकीचा भाग हा करड्या रंगाचा असतो.

मेंदूचे सुरक्षा कवच :-

मेंदूला दोन प्रकारचे सुरक्षा कवच असतात, एक कपालभाती ( डोके बनवणारी हाडे ) आणि दुसरं मस्तिष्कावरण हे दोघे मेंदूला सुरक्षा प्रदान करतात. मानवी कवटी म्हणजे मेंदुवरील हाडांच आवरण, या कवटीला एकूण 22 हाडे असतात, त्यापैकी आठ हाडे ही मेंदुसाठी असतात त्यांना क्रॅनिअल बोन्स असे म्हणतात आणि राहलेली 14 हाडे ही चेहऱ्यासाठी असतात. मेंदू हलू नये किंवा त्याला इजा होऊ नये म्हणून मेंदूवर तीन आवरणे असतात. मेंदूच्या वर ड्युरा मॅटर, अर्केनोइड मॅटर आणि पिया मॅटर या तिघांचे आवरण असल्याने मेंदू सुरक्षित राहतो.

मेंदूचे मुख्य भाग :-

मेंदूचे मुख्य पाच भाग आहेत.

  • (1) सेरेब्रम
  • (2) सेरेबेलम
  • (3) ब्रेन स्टेम
  • (4) स्पायनल कॉर्ड
  • (5) न्यूरॉन्स

(1) सेरेब्रम CEREBRUM : –

मेंदूच्या एकूण वजनाचा 83 % भाग हा सेरेब्रमने व्यापलेला आहे, सेरेब्रम हा दोन भागा मिळून बनलेला आहे एक उजवा भाग आणि दूसरा डावा भाग आणि हे दोन भाग कॉर्पस कॅलॅसम ने जोडलेले आहेत सेरेब्रम मध्ये मोठ्या प्रमाणात न्यूरॉन्स आणि ग्लिया पेशी असतात, आपल्या अनेक मानसिक प्रक्रियेला जबाबदार असणारा हा भाग करड्या रंगाचा दिसतो, यातून मज्जातंतु म्हणजे नर्व्ह फायबर निघून ते मेंदूच्या इतर भागांना जोडलेले असतात, या नर्व्ह फायबरच्या भोवती मायेलिन या पांढऱ्या पदार्थाच आवरण असल्याने या भागात करड्या रंगा बरोबर पांढरा रंग ही दिसतो, सेरेब्रममध्ये साधारण एक कोटीच्या आस पास न्यूरॉन्सच्या जोडण्या असतात. सेरेब्रम हा चार भागात विभागलेला आहे.

  • फ्रन्टल लोब
  • पॅरीटल लोब
  • ऑक्सिपिटल लोब
  • टेम्पोरल लोब

फ्रन्टल लोब FRONTAL LOBE : –

मेंदूच्या सर्वात पुढच्या भागाला फ्रन्टल लोब असे म्हणतात, विचार करणे, नियोजन करणे, शरीराच्या व्यवस्थित हालचाली करणे, स्वतःच व्यक्तिमहत्व तयार करणे, भावनांची देवाण – घेवाण, लिखाण करणे, सर्व स्नायूची कार्य व्यवस्थित करणे, स्वतः ची बुद्धिमत्ता, कुठल्याही गोष्टीवर निर्णय घेणे, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून एकाग्र होणे, आकडे मोड करणे, समस्या वर तोडगा काढणे, भाषा शिकणे आणि खास गोष्ट म्हणजे आपण केलेले सर्व गणितं याच भागात असतात, आशा सर्व महत्वाच्या क्रिया आपण फ्रन्टल लोब मधूनच करत असतो. हा भाग विकसित होण्यासाठी बराच काळ लागला या भागाचा विकास अलीकडच्या काळात झाला फक्त काही हजार वर्षा पूर्वीच. हा भाग वयाच्या 18 वर्षा पर्यंत विकसित होत असतो.

पॅरिटल लोब PARIETAL LOBE : –

मेंदूच्या वरच्या भागामध्ये म्हणजे टाळूवर आणि फ्रन्टल लोब च्या मागे पॅरीटल लोब असतो. या लोब मध्ये ग्रहनशक्ती असते, कुठल्याही गोष्टीची मांडणी करणे, बोलण्याचे कौशल्य, कार्याचे कौशल्य, सर्व प्रकारचे संगीत, सर्जनशीलता, तत्वज्ञान, भूगोल, आकाशाची माहिती, वेदणाची जाणीव, दृष्टी, श्रवण, स्मृति आणि कुठल्याही गोष्टीचे अंदाज बांधणे ह्या सर्व गोष्टी पॅरिटल लोब मधूनच होतात.

ऑक्सिपिटल लोब OCCIPITAL LOBE :-

हा मेंदूचा मागचा भाग आहे, याच ऑक्सिपिटल लोब मुळे आपण रंग ओळखणे, या लोबच महत्वाच कार्य म्हणजे एखादी गोष्ट पाहून विश्लेषण करणे आहे तिला समजून घेणे, प्रतिक्रिया देणे, डोळे उघडे ठेऊन स्वप्न पाहणे, हे सर्व कार्य आपण ऑक्सिपिटल लोब मुळेच करू शकतो.

टेम्पोरल लोब TEMPORAL LOBE :–

डाव्या आणि उजव्या काना जवळ असणाऱ्या मेंदूच्या भागाला टेम्पोरल लोब असे म्हणतात. या लोबचा उपयोग ओळख पटवण्यासाठी, सुगंध आणि दुर्गंध, भावना समजण्यासाठी, बोलतांना व्याकरणासाठी, स्मरणशक्ती आणि आवाज एकण्यासाठी या सर्व कार्यासाठी टेम्पोरल लोबचा उपयोग होतो.

(2) सेरेबेलम CEREBELLUM :–

मेंदूच्या एकदम सर्वात मागच्या भागाला सेरेबेलम असे म्हणतात. शरीरातल सर्व समतोल राखणे, निरनिराळ्या अवयवामध्ये समन्वय ठेवण्याची कामगिरी बजावत असतो. आपण ज्या हालचाली करतो त्याच्या टायमिंग च बरोबर नियोजन यामुळे होत, सेरेबेलममुळे आपण कुठल्याही वस्तूचे आकार नीट समजू शकतो, बघितलेल्या वस्तुचे चित्र काढणे, वाचन, लिखाण श्वासोश्वास आणि डोळ्यांच्या हालचालीवर सरेरेबेलम नियंत्रण ठेवत असतो. यामध्ये बिघाड झाल्यास आपण वस्तु व्यवस्थित पकडू शकत नाही.

(3) ब्रेन स्टेम BRAIN STEM :–

ब्रेन स्टेम ला मेंदुच देठ ही म्हणतात. हा मेंदूचा सर्वात खालचा भाग आहे. हा भाग सरपटणाऱ्या प्राण्यापासून ते मनुष्या पर्यंत सर्वांच्या मेंदूत असतोच. या मध्ये घडणाऱ्या सर्व क्रिया ह्या अनैच्छीक क्रिया असतात. जसे की श्वास घेणे, रक्तभिसरण, अन्नपचन, हृदयाच्या ठोक्याचा वेग नियंत्रित ठेवणे, उलट्या होणे, शिंकणे, लाळ येणे, तहान भूक लागणे, आशा प्रकारच्या सर्व अनैच्छीक हालचालिवर नियंत्रण ठेवण्याच काम ब्रेन स्टेम करत असतो.

(4) स्पायनल कॉर्ड SPINAL CORD :–

त्वचे पासून होणाऱ्या जाणीवा जसे आपल्याला कोणी घेतलेला चिमटा, आपल्याला थंडीची जाणीव होणे, आपल्या शरीराच्या होणाऱ्या हालचाली, हे कार्य स्पायनल कॉर्ड मुळेच शक्य होते. आपल्या शरीरात जे संदेश वाहतात ते या स्पायनल कॉर्ड च्या माध्यमातूनच वाहत असतात. समजा आपला हात विजेच्या उघड्या तारेवर पडला तर आपल्याला शॉक लागतो, हा शॉक जर हलक्या प्रमाणात असेल तर त्याची जाणीव मोटार न्यूरॉन्स द्वारे हातातून स्पायनल कॉर्ड कडे वाहते, स्पायनल कॉर्ड तीच जाणीव मेंदूकडे पाठवते, मेंदू त्या जानीवेला समजून घेऊन लगेच संदेश देतो स्पायनल कॉर्ड ला आणि स्पायनल कॉर्ड संदेश देतो हाताला की आपल्याला हात काढायचा आहे. आणि मग आपण उघड्या तारेवरचा हात लगेच काढून घेतो. थोडक्यात सांगायच झाल तर मानेपासून खालच्या शरीराला कुठलंही कार्य करायच असेल तर त्यासाठी स्पायनल कॉर्ड मदत करत असतोच. हे सर्व घडत असतांना दोन प्रकारच्या सिस्टम ने घडत असत एक सेंट्रल नर्वस सिस्टम आणि दुसरी पेरिफेरल नर्वस सिस्टम.

(5) न्यूरॉन्स NEURONS : –

मेंदूचा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे न्यूरॉन्स, याची एकूण संख्या शंभर आब्ज्याच्या आस पास आसते, पण प्रत्येक न्यूरॉन इतर अनेक न्यूरॉनशी सिनॅप्स द्वारे जोडलेला असतो, काही जोडण्या जन्मापासूनच तयार झालेल्या असतात. आपली जशी जशी वाढ होते तशाच न्यूरॉन्सच्या जोडण्या वाढत जातात. यापैकी काही आयुष्य भर टिकून राहतात तर काही कमकुवत होतात त्या तुटून नंतर काही जोडल्या ही जातात आणि काही संपून ही जातात. या व्यतिरिक्त त्यांना आधार देणाऱ्या त्यांच्या मधली ऊर्जा सांभाळणाऱ्या साध्या साध्या कामकरी पेशी ही असतात त्यांना ‘ग्लिया सेल’ असे म्हणतात. साधारण एका न्यूरॉन सोबत पन्नास ‘ग्लिया सेल’ काम करत असतात.

SHARE POST

Leave a Reply